बातम्या

Paytmची जबरदस्त ऑफर ; LPG सिलेंडरच्या बुकिंगवर २७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक; कसं बुक कराल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । सध्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात रोज वापरल्या जाणाऱ्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्यांच्या किचनच बजेट बिघडलं आहे. सध्या १४.२ किलो LPG सिलेंडरची किंमत 834.5 रुपये इतकी आहे. दरम्यान, तुम्ही जर पेटीएमवरून LPG गॅस सिलेंडर बुक केलं तर तुम्हाला सलग तीन महिने सलग ९००-९००-९००- रुपयांचं कॅशबॅक मिळेल.

पेटीएमने नुकतीच एक कॅशबॅक आणि रिवॉर्ड ऑफरची घोषणा केली आहे. त्यात नवीन युजर्सना ३ पे २७०० कॅशबॅक ऑफर’ (3 pe 2700 cashback offer) चा फायदा घेऊ शकतात. या ऑफरमध्ये सलग तीन महिन्यासाठी ग्राहकांना पहिल्या बुकिंगवर ९०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. सध्याच्या ग्राहकांना प्रत्येक बुकिंगवर ५००० पर्यंत निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील. टॉप ब्रँड्समधून गिफ्ट व्हाउचर आणि काही खास डील्स मिळवण्यासाठी हे कॅशबॅक पॉइंट्स रीडीम केले जाऊ शकतात. तर कसं बुक कराल? जाणून घ्या….

सर्वात अगोदर Paytm App डाऊनलोड करा.
त्यानंतर सिलेंडर बुकिंगवर जा. आपल्या गॅस एजन्सीला निवडा. यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. भारत गॅस, इंडियन गॅस आणि HP गॅस दिसतील.
यानंतर तुमचा रजिस्टर नंबर टाकून LPG ID किंवा कस्टर नंबर टाका. ही माहिती भरल्यानंतर Proceed च्या बटणावर क्लिक करून पेमेंट करा
यानंतर महत्वाची बातमी कॅशबॅक पहिल्यांदा LPG सिलेंडर बुक करणाऱ्यांना ग्राहकांना मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात तीन गॅस सिलेंडर बुक केल्यावर पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक तीन महिनांपर्यंत मिळणार आहे. ही कॅशबॅक 10 रुपये ते 900 रुपयांपर्यंत मिळणार आहे.
यासोबतच Paytm आपल्या कस्टमर्सला देखील खास सुविधा देखील देऊ शकतात. यामध्ये युझर्स आता गॅस बुक करून त्याचं पेमेंट पुढच्या महिन्यात करू शकतात.

काय आहे कंपनीची स्कीम
Paytm ने युझर्सकरता 3 Pay 2700 Cashback Offer सुरू केलीय
Paytm च्या म्हणण्यानुसार,’युझर्सला प्रत्येक बुकिंगवर 5000 पर्यंत कॅशपॉइट्स मिळणार आहे. यासोबतच शानदार डील आणि टॉप ब्रांड गिफ्ट वाऊचरवर मिळेल.’
Paytm ने हल्लीच आपल्या फिचर्सला सिलेंडर बुकिंग जोडून ग्राहकांना चांगला अनुभव दिला आहे. युझर्सला सिलेंडर डिलीवरी ट्रॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच फोनवर सिलेंडर बुक करण्याच रिमांइडर देखील दिलं आहे.
Paytm ने गेल्यावर्षी ‘बुक ए सिलेंडर’ सर्विस सुरू केली आहे. यामध्ये कंपनी सर्वात अगोदर HP शी संबंधीत आहे. यानंतर इंडियन ऑइल आणि भारत गॅससोबत पार्टनशिप केली आहे. या सेवेचा कंपनी आणि ग्राहकांना फायदा होईल.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button