जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । जुलै महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र आठवड्याच्या अखेरला शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या वाढलेला वाऱ्याचा वेग देखील दाेन दिवसांनी कमी हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाचे ढग आणि प्रमाण विषम आहे. काेकण, गाेवा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जाेर असूनही कायम आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही पावसाची तूट कायम आहे. तुरळक ठिकाणीच मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे.
गुरुवारी उत्तर-मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित ठिकाणी पाऊस तुरळक असेल. शनिवार आणि रविवारी उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जाेर वाढले. वाऱ्याचा वेग ताशी ११ किलाेमीटरपर्यंत असेल. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस हाेत असल्याने तापीला पूर येऊ शकताे.