जळगाव जिल्हाबातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर; दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या कधीपासून लागणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांना यंदा १३ दिवसांची दिवाळी सुट्टी आणि ४३ दिवसांची उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्ट्यांचे नियोजन वेळेत मिळाल्यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांना आपल्या कौटुंबिक प्रवासाचे पूर्वनियोजन करणे सोपे होणार आहे. School holiday schedule for Maharashtra announced

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शाळांना दिवाळीनिमित्त २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी राहणार आहे. या सुट्टीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून शाळांमधील नियमित वर्ग पुन्हा सुरू होतील. याच दिवसापासून शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीच्या काळात धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज यांसारखे सण येत असल्याने विद्यार्थ्यांना कुटुंबासोबत सण साजरे करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

उन्हाळ्यात ४३ दिवसांची सुट्टी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिले सत्र १५ जून ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन १ मे २०२७ पर्यंत चालणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना सलग ४३ दिवसांची सुट्टी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शाळांना स्वतःहून बदल करता येणार नाही

सुट्ट्यांच्या वेळापत्रकात शाळा व्यवस्थापनाने स्वतःहून बदल करू नयेत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थानिक सण किंवा अपरिहार्य कारणांमुळे सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल करायचा असल्यास संबंधित शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.सुट्ट्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळी तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button