जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । राज्यातील काही ठिकाणी सुरुवातीला मान्सूनने चांगली जोरदार हजेरी लावली. परंतु गेल्या काही दिवसापासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे.
जून महिना संपत आला तरी राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मागील गेल्या तीन चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे समाधानकारक पाऊस नसला तरी पिकांना काहीसा दिलासा मिळाल्याने बळीराजाचा चेहरा फुलला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बदलते वातावरण पाहता येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.