चोपडा पोलिसांचा मोठा दणका; ५ लाखांचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त!

एप्रिल 23, 2026 8:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहर पोलिसांनी चुंचाळे येथे शेतात छापा टाकून तब्बल ५ लाख ३४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

cotton beej

मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे येथील संशयित नितीन नंदलाल चौधरी याने आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा बेकायदेशीर साठा केल्याची खात्रीशीर माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांना गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला बियाण्यांचा साठा मिळून आला.

यानंतर पुढील तपासासाठी कृषी विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता नऊ गोण्यांमध्ये एकूण २०२ किलो वजनाचे ४५० पाकिटे सापडले. शासनस्तरावर बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विनापरवाना साठवणूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित नितीन चौधरी याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now