जळगाव शहर
हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज गुरुवारी दुपारी ४ वाजेला प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून ५ हजार ६५० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी आतापर्यत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. प्रकल्प पाणीपातळी २०९.८२० मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.