जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । पीएम ई-बस योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला ५० ई-बसेस मंजूर झालेल्या असून कंपनीला वर्कऑर्डरही देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहर व शहरालगत असलेल्या गावांसाठी लवकरच पीएम ई-बस सेवा सुरु होणार आहे.

महापालिका प्रशासनाने त्यासाठी प्राथमिक स्तरावर १८ मार्ग निश्चित केले आहेत. याव्यतिरिक्त आणखी कोणते मार्ग असावेत, कुठे थांबा असावा, यासंदर्भात नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले असून, आठवडाभरात आमदार व खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यात मार्ग निश्चित केले जाणार आहेत.
पीएम ई-बस योजनेच्या बस सेवेसाठी महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानाच्या जागेत बस डेपो उभारण्याच्या कामाला गती आलेली आहे. जुने बसस्थानकातून या बसेस सुटणार आहेत. तेथून प्रशासनाने १८ मार्ग निश्चित केले आहेत. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या भागात बस गेली पाहिजे, तेथील प्रवाशांचा प्रतिसाद, कुठे थांबे असावेत यासंदर्भात नागरिकांकडून अभिप्राय व सूचना लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या आहेत.
या ठिकाणचे प्राप्त झालेय अभिप्राय अन् सूचना
मोहाडी महिला रुग्णालय, खेडी-कढोली, टाकरखेडा, वडनगरी, म्हसावद, तरसोद, गोदावरी फाउंडेशन, शिरसोलीसह शहरातील कुंभारखोरी, कोल्हे हिल्स, मोहाडी रस्त्यावरील शिवनेरी चौक, नवनाथनगर, आशाबाबानगर, रामानंदनगर पोलिस ठाणे, असोदा आदी ठिकाणी बससेवा व थांबे सुचविण्यात आलेले आहेत. जैन हिल्स, जळगाव शहर महानगरपालिका कामगार युनियन, विविध ग्रामपंचायती व नागरिकांनी अर्ज दाखल केलेले आहेत.