जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । तुम्हीही जळगावात हक्काचे घर घेण्याचा विचार करत असाल, तर थांबा.. कारण घराच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आजपासून जळगावात खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे दर वाढले आहेत. त्याचं कारण म्हणजे रेडीरेकनर दरांमध्ये झालेली वाढ. राज्य सरकरने रेडीरेकनर दरामध्ये वाढ केली आहे. रेडीरेकनरमध्ये जळगावात ५.८१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

हे नवीन दर आज म्हणजेच १ एप्रिलपासून लागू झाले असून यामुळे घराच्या किंमती वाढणार आहेत.या नवीन दरामुळे साधारणपणे शहरातील १५ लाख रुपयांचे घर ९० हजार रुपयांनी महागणार आहे. याचा लाभमालमत्ताधारकांसह विकासकांना मिळणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी सन २०२२-२०२३मध्ये रेडीरेकनर दर सरासरी सहा टक्के वाढले होते. यानंतर मंदी व कोरोनाच्या काळात दर वाढवले नव्हते दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विकासाचा विचार करता यंदा डीपीसीने दर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यात शहरात १० टक्के वाढवण्याची मागणी केली होती. सोमवारी सायंकाळपर्यंत नाशिकच्या विभागीय कार्यालयात निर्णयाची प्रतीक्षा सुरू होती. अखेर काल ३१ मार्चच्या रात्री ८ वाजता निर्णय घेऊन रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली. मागणीच्या निम्मेच ही वाढ झाली आहे. दरम्यान, या वाढीमुळे जळगाव शहरातील १५ लाख रुपयांचे घर आता सुमोर ९० हजार रुपयांनी महाग होईल, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.