जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । रब्बी हंगामाची काढणी व कापणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या घरात माल यायला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गहू, हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे. एकीकडे पिकांची काढणी सुरू असताना दुसरीकडे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील पिकांच्या खरेदीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे.

बाजार समितीत खरेदीला सुरुवात झाली असली तरी रब्बी पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. हंगाम संपत आला तरी शासनाकडून तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. नवीन हरभरा बाजारात बाजारात दाखल झाला असला तरी हरभऱ्यालाही हमीभाव इतका भाव सध्या मिळत नसल्याचे चित्र आहे.
हरभऱ्याला इतका मिळतोय भाव?
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात साध्या हरभऱ्याला ५००० ते ५४३५ रुपये, गुलाबी हरभरा ७६०० ते १०५०० रुपये, चिनोरी हरभरा ५९०० ते ६००० रुपये, तूर ६६५० ते ६७२५ रुपये भावाने खरेदी होत आहे.