जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । सध्या सुरु असलेल्या सणासुदीसह लगीनसराईच्या दिवसात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. मात्र यातच सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने प्रति तोळा विनाजीएसटी ८७ हजारावर गेला आहे. त्यामुळे खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान आज सोने दरात किंचित घसरण झालेली दिसून येत आहे.

गुरुवारी सोने दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर काल बाजारात बंद असल्याचे दर स्थिर होते. आज सोन्याच्या किंमतीत 110 रुपयाची घट झाली आहे. या चालु आठवड्यात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर असले तरी येत्या आठवड्यात सोन्याचे दर प्रतितोळा दोन हजार रुपयांनी वाढण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
३ रोजी सुरू झालेल्या गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ८५५०० रुपये होते. त्यात आठवडाभर शंभर रुपयांची चढउतार सुरू होती. गेल्या आठवड्यात १०० रुपयांनी चढ-उतार होणारे सोन्याचे दर या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसात स्थिर होते. तर गुरुवारी त्यात ७०० रुपयांची वाढ होऊन गुरुवारी ते ८७३०० रु. प्रतितोळ्यावर पोहोचले होते. तर आज सोने दरात किंचित झट झाल्याने आता २४ कॅरेट सोन्याचा दर ८७२०० रुपयांवर (जीएसटीसह ८९,८१६) रुपये इतका आहे. दुसरीकडे १० ग्रॅम चांदी १,०३० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,३०० रुपये आहे.