जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होत आहे. मार्चच्या पंधरवाड्यातच जळगावात गेल्यावर्षीपेक्षा तापमानात अधिक आहे. ही स्थिती पाहता यंदाचा उन्हाळा जळगावसाठी असह्य ठरू शकतो, असा अंदाज आहे.

६ मार्च रोजी जळगावच्या तापमानात मोठी घसरण झाली होती. १७ असलेला किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले होते. तर कमाल तापमान ३३ अंशापर्यंत होते. किमान तापमानात घसरण झाल्यामुळे जळगावकरांना रात्री आणि पहाटे गारवा जाणवला. मात्र त्यांनतर तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आले.मार्च महिन्याचे निम्मे दिवस होत नाही, तोच प्रखर उन्हाची तीव्रता जळगावात जाणवू लागली आहे. रखरखीत उन्हाने बाहेर पडणे अशक्य होत आहे.
मागील काही दिवसापासून कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला असून जिल्ह्यातील जळगाव, भुसावळसह काही ठिकाणीच्या तापमानाने यंदा मार्चमध्येच चाळिशी ओलांडली आहे. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला असून आतापर्यतची ही सर्वाधिक उच्चांकी नोंद ठरली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त होऊ लागले आहेत. तापमानात अधिक वाढ होत असल्याने सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे.
दुपारच्या वेळेस भाजून काढणारे तापमान जाणवत आहे. खरंतर गेल्या वर्षीच्या १५ मार्च रोजी जळगावचे तापमान ३६ अंशापर्यंत होते. ते यंदा ४० अशांवर गेलं आहे. ही स्थिती पाहता यंदाचा उन्हाळा असह्य ठरू शकतो, असा अंदाज आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टिप्स:
शक्यतो दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान थेट उन्हात जाणे टाळा.
बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी आणि लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थांचे सेवन करा.
हलके, सूती आणि सैलसर कपडे घाला.
जड आणि तळलेले पदार्थ टाळा, शक्यतो हलका आहार घ्या.
उष्णतेच्या लक्षणे (डोकेदुखी, गरगरणे, घाम जास्त येणे, थकवा) जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुणेकरांनी उन्हाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.