---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

रिक्षा चालक मोबाईलवर यू-ट्युबवर रमला, अन् घडला अनर्थ; एकाचा जागीच मृत्यू, नऊ जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड येथे दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात रिक्षाच्या धडकेत मार्निंक वॉक करणाऱ्या ५७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर रिक्षामधील नऊ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. मनोज भीमराव पाटील-चिखलीकर (वय ५७) असं मयत व्यक्तीचे नाव असून ही घटना नाडगाव रस्त्यावर घडली.

s

या घटनेबाबत असे की, जेडीसीसी बँक समोरील रहिवासी मनोज भीमराव पाटील-चिखलीकर हे अरुण सोनवणे यांच्यासोबत नाडगाव रस्त्याने सकाळी ६ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असताना बिस्मिल्ला इस्लामी हॉटेलसमोर मागून ऑटो रिक्षा क्रमांक एमएच १९ एक्स-३७६३ या वाहनाने मनोज भीमराव पाटील यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षामधील नऊ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींपैकी मार लागलेल्या चार जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल के आहे. तर चार व्यक्ती जामनेर खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

---Advertisement---

याप्रकरणी अरुण सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक शुभम वासुदेव कातोरे याच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय सुजित पाटील करत आहे.

रिक्षा चालकाचे यूट्युबवर लक्ष होते
दरम्यान, रिक्षा चालक शुभम वासुदेव कातोरे रा. नाडगाव हा त्याच्याकडील मोबाईलवर यू ट्युबवर रमला होता, त्यामुळे वाहनावरील त्याचा ताबा सुटला. त्याने वाहन अविचाराने घाईने भरधाव वेगाने चालवून अपघात घडवला. रिक्षामधील सर्व प्रवासी बोदवडहून नायगाव रेल्वे स्टेशनवर शेगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांना प्राथमिक उपचारासाठी बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment