जळगाव जिल्हा

पाचोरा रेल्वे दुर्घटना: १०८ ची आसनक्षमता असलेल्या जनरल डब्यात होते २५० पेक्षा जास्त प्रवाशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । पाचोरा जवळील परधाडे रेल्वे दुर्घटनेने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडले गेलेल्या १२ प्रवाशांमध्ये सर्वच प्रवासी जनरल डब्यातील हाेते. विशेष रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांसाठी आसनक्षमता १०८ आहे. मात्र प्रत्यक्षात बसणाऱ्या प्रवाशांची संख्या ही २५० ते ३०० एवढी हाेती.

पुष्पक एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात क्षमतेच्या अडीच ते तीनपट प्रवासी हाेते. तीन डब्यांतील पाचशेपेक्षा अधिक प्रवासी आगीच्या अफवेनंतर जनरल डब्यातील प्रवाशांनी गाडीतून खाली उड्या मारल्या. त्यामुळे डबा रिकामा झाला.

दुसरीकडे मनमाडकडून भुसावळकडे येणारी कर्नाटक एक्स्प्रेस आली त्या वेळी पटरीवर असलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्याचा प्रयत्नही केला. परंतु दाेन्ही बाजूंनी असलेल्या प्रचंड गर्दीमुळे अडकलेल्या प्रवाशांना काही सेकंदांत ट्रॅक ओलांडून जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशी कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली येऊन चिरडले गेले, अशी माहिती आता समोर आली आहे.

लखनऊपासूनच जनरल डब्यात प्रचंड गर्दी हाेती. प्रत्येक स्थानकावर गर्दीत वाढ हाेत गेली. अनेक प्रवासी एका पायावर उभे राहून प्रवास करत हाेतेे. लहान मुले तर सीटखाली झाेपली हाेती. आग लागल्याची अफवा कानावर आल्यानंतर प्रत्येक जण जिवाचा आकांत करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत हाेता. प्लॅटफाॅर्म नसल्याने खाली उतरताना खूप वेळ लागत हाेता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button