स्टेट बँक ऑफ इंडियाची ४४४ दिवसांची लयभारी योजना; मिळणार भरघोस परतावा..
जळगाव लाईव्ह न्यूज । भविष्यात आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी लोक विविध गुंतवणूक योजनांकडे वळतात. या योजनांमध्ये काही असे पर्याय आहेत जे सुरक्षित आणि आकर्षक परतावा देतात. अशीच एक योजना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे, ज्यामुळे तुम्ही कमी कालावधीत चांगले व्याज मिळवू शकता.
स्टेट बँकेची अमृत वृष्टी योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) १५ जुलै २०२४ रोजी ‘अमृत वृष्टी’ योजना (Amrit Vrishti scheme) सुरू केली आहे. ही योजना ४४४ दिवसांची आहे आणि तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळेल.
गुंतवणूकीची मर्यादा आणि व्याज दर
अमृत वृष्टी योजनेत तुम्ही कमीत कमी १,००० रुपये गुंतवू शकतात आणि जास्तीत जास्त ३ कोटी रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत महिन्याला, तिमाही आणि छमाही आधारावर व्याज मिळेल. नवीन डिपॉझिट आणि सध्याचे डिपॉझिट रिन्यू झाल्यावर हे लागू होणार आहे.
मुदतीपूर्वी पैसे काढण्याच्या नियमावली
या योजनेत जर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार आहे. ५ लाख गुंतवणूकीवरील पैसे काढले तर ०.५० टक्के पेनल्टी भरावी लागणार आहे, तर ५ लाख ते ३ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकीमधील पैसे काढले तर १ टक्के दंड भरावा लागतो. सात दिवसांमध्ये जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला व्याज द्यावे लागत नाही. स्टेट बँकेच्या स्टाफ आणि पेन्शनधारकांना पेनल्टीपासून सूट मिळते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेत तुम्ही स्टेट बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही मोबाईल अॅपवरूनदेखील अर्ज करू शकतात. ४४४ दिवसांची पीरियड निवडल्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.