जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । जळगावसह राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या बदलामुळे कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती झालेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जळगावचे किमान तापमान ८ ते ९ अंशाखाली गेले होते. मात्र, दोन दिवसांपासून जळगाव शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ झाली. यामुळे गेल्या दोन दिवसांतच रात्रीच्या तापमानात ५ अंशांपर्यंतची वाढ झाली आहे. Jalgaon Weather News
दरम्यान आज १३ आणि १४ जानेवारी दरम्यान कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आज सोमवारी सकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर दिसून आली. सोबतच वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवला. दरम्यान, १५ जानेवारीला जिल्ह्यात विविध ठिकाणी काहीसे ढगाळ वातावरण राहू शकते. संक्रांतीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला थंडीमुक्त दिवस राहण्याचा राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले होते. मात्र, चारच दिवस थंडीचा कडाका जाणवला. अंगाला झोंबणारी थंडी जाणवत होती. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम जळगावातील वातावरणावर दिसून आला.