⁠ 
[rank_math_breadcrumb]

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम; कर्जमाफीबाबत काय म्हणाले ऐकलंत का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असं जाहीर केले होते. आता राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं.मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. यातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला.

काय म्हणाले अजित पवार?
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवारांनी केले. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही, या संभ्रमात अडकले आहेत.

मी जेवढी भाषणं केली…तुला एक माहिती आहे का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात… राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू… तुला मी माझी परिस्थिती सांगतो…मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही”.असंही ते म्हणाले

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरू आहेत. आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.