⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | बातम्या | वातावरण पुन्हा बदलले: जळगावात आजपासून पुढचे पाच दिवस असं राहणार तापमान?

वातावरण पुन्हा बदलले: जळगावात आजपासून पुढचे पाच दिवस असं राहणार तापमान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । जळगावसह महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार आज रविवारी वातावरणासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये सध्या थंडी-पावसाचा खेळ सुरूच आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता. जळगावसह अनेक जिल्ह्यातील तापमान १० अंशाखाली घसरल्याने बोचरी थंडी जाणवत होती. मात्र पावसाला पोषक हवामान होत ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. तापमानात वाढ होत अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या वर गेला आहे.

विशेष जळगाव जिल्ह्यात या आठवड्यातील बुधवारी किमान तापमान ८.२ अंशापर्यंत घसरले होते. त्यात शनिवारी वाढ होऊन थेट १३ अंशापर्यंत पोहोचले. यामुळे जिल्ह्यात थंडी कमी झाली आहे. दरम्यान, आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आगामी दोन तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून यादरम्यान किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.दरम्यान धुके अन् ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना फटका बसत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

जळगावात आगामी पाच दिवस असं राहणार तापमान?
१२ डिसेंबर : ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
१३ डिसेंबर : ढगाळ वातावरण
१४ डिसेंबर : ढगाळ वातावरण
१५ डिसेंबर : निरभ्र वातावरण
१६ डिसेंबर : निरभ्र वातावरण
१७ डिसेंबर : निरभ्र वातावरण

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.