⁠ 
[rank_math_breadcrumb]

ऑनलाइन फसवणूक थांबेना! जळगावच्या डॉक्टरला तब्बल 3156000 रुपयात गंडविले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । सायबर ठगांकडून (online fraud) फसणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत जनजागृती करूनही लोक या घटनांना बळी पडत आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षितही सायबर ठगांच्या मोहाचे बळी ठरत आहे. आता अशातच जळगावातील डॉक्टरची तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांमध्ये फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या संदर्भात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. Jalgaon doctor online fraud

शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो करेंसी, पॉलिसी, सेक्सटॉर्शन, कुरिअर, फ्रेन्चाईसी, फिशिंग कॉल, डिजिटल अॅरेस्ट अशी वेगवेगळी कारणे पुढे करीत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. याविषयी विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. त्यात गेल्या महिन्यांपासून तर कॉल केल्यानंतर प्रत्येक कॉलला सुरुवातीला डिजिटल अरेस्टविषयी जनजागृती करणारी कॉलर ट्यून कानी पडत आहे. असे असतानाही मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगत अटकेपासून वाचण्यासाठी दिलेल्या धमकीला जळगावातील डॉक्टर बळी पडले

जळगाव शहरातील निवृत्तीनगर, कार्तिक स्वामी मंदिरामागे वास्तव्यास असलेले डॉ. दिगंबर उगले यांना ३१ मार्च रोजी राधिका नावाच्या अनोळखी महिलेने आपण ‘ट्राय’ मधून बोलत आहोत. तुमच्या मोबाइलवरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवले आहेत. तुमच्या विरुद्ध बांद्रा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले आहेत. ईडीची नोटीस बजावली आहे.

उगले यांना भामट्यांनी सक्त वसुली (Enforcement Department) विभागाने अटक केलेल्या नरेश गोयल याने तुमचे कॅनरा बँकेचे खाते वापरले. तुम्ही हे खाते नरेश गोयल याच्याकडून २५ लाख रुपये घेऊन त्याला विकले आहे, असेही भामट्यांनी सांगितले

भामट्यांनी या सर्व गुन्ह्यात अटक होऊन तुमची प्रतिष्ठा जाईल. ती जाऊ नये म्हणून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. तुम्ही व्हिडिओ कॉल बंद करू नका असे सांगून शहरातील डॉ. दिगंबर उगले त्यांच्या खात्यातून ३१,५६,०६४ रुपये स्वीकारल्याची तक्रार सायबर शाखेत केली. तपास सायबर शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड करताहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.