⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | बातम्या | Ladki Bahin योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही..

Ladki Bahin योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेत दर महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै ते डिसेंबरपर्यंतचे ९००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींचे लक्ष जानेवारी महिन्याच्या पैशांकडे आहे. अशातच लाडकी बहीण योजनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलीय. या योजनेत काही महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana Upadate

लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निश्चित अटी आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे आणि त्या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिला आणि पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

इतर योजनांचा लाभ आणि वाहन मालकी
ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ही योजना मिळणार नाही. त्याचसोबत, ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

डिसेंबरचा हप्ता आणि नव्या लाभार्थींचा समावेश
डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या आठवडाभरात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की, डिसेंबरचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणेच जमा होणार आहे. या योजनेत आता जवळपास १२ लाख नव्या महिलांचा समावेश होणार आहे, ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.