⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावच्या महिला वकिलाची तब्बल 75 लाख रुपयात फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । फडवणुकीच्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच जळगाव शहरातील एका वृद्ध महिला वकिलाला लाखो रुपयात फसविल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमध्ये राहणारी ६५ वर्षीय शिरीन गुलाम अली अमरेलीवाला ही महिला जळगाव जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करते. तिच्या ओळखीतले मनीष सतीश जैन याने तिला एक कंपनीची खोटी माहिती दिली आणि कंपनीसाठी पैसे दिल्यास प्रत्येक महिन्याला दीड टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले.

मुख्य घटनाक्रम
डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीत, मनीष जैन आणि त्याच्या सहकार्यांनी शिरीन अमरेलीवाला यांच्याकडून एकुण ७५ लाख रुपये घेतले. या कट कारस्थानमध्ये मनीष जैन, त्याचा भाऊ अतुल सतिष जैन, त्याची आई यशोदा सतिष जैन, जाफरखान मजीद खान, विजय इंदरचंद ललवानी, अक्षय अग्रवाल आणि केतन किशोर काबरा यांचा सहभाग होता.

धमकी आणि तक्रार
ऑगस्ट २०२४ मध्ये, शिरीन अमरेलीवाला यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी मनीष जैन यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, मनीषने त्यांना पैसे देण्यास नकार दिला आणि त्याच्या घरातील अतुल सतीश जैन आणि यशोदा सतीश जैन यांनी धमकावत पैसे मिळणार नाहीत असे सांगितले. यामुळे शिरीन अमरेलीवाला यांनी ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.