⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | गुन्हे | पाचोऱ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त; चौघांवर गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पाचोऱ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त; चौघांवर गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२५ । जळगाव शहरात वाहनात अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटामध्ये सात जणांना जीव गमवावा लागलाय. यानंतर जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध गॅस भरणा केंद्रावर छापे मारले जात असून याच दरम्यान पाचोरा शहरात अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पाचोरा शहरात अवैधरीत्या खाजगी वाहनांमध्ये जारगाव चौफुली जवळ सर्रासपणे गॅस भरणे सुरु असल्याची माहिती पोलिस प्रशासन व महसूल विभागास मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत घटनास्थळावरून ५ लाख रूपये किमतीचा दोन चारचाकी वाहने, २१ घरगुती गॅस सिलेंडर, गॅस भरणाऱ्या इलेक्ट्रिक मशिन, वजन काटे असा ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून चार जणांना ताब्यात घेतले आहे. शहरातील जारगाव चौफुली ते भडगाव रोडवरील रामदेव लॉन्सजवळ वळणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये खाजगी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दुकानांवर पोलिस व महसूल विभागाच्या पथकांनी संयुक्तरीत्या छापा मारला.

या ठिकाणी ५ लाख रुपये किंमतीची दोन चारचाकी वाहने, ६३ हजार रुपये किंमतीचे २१ गॅस सिलेंडर, ३४ हजार ५०० रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक मशिन, वजन काटे असा ६ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावरून ब्रिजेश हिम्मत जाधव वैभव श्रीकृष्ण सूर्यवंशी दोघेही (रा. कुऱ्हाड ता. पाचोरा), करण वनेश गवळी (रा. शिवाजी नगर) व सागर अशोक जाधव (रा. मोंढाळे) या चार जणांना ताब्यात घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.