⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | बातम्या | अंतरंग फ्रेशर्स पार्टी अन् वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष

अंतरंग फ्रेशर्स पार्टी अन् वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या वतीने आयोजित अंतरंग फ्रेशर्स पार्टी आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ. उल्हास पाटील होते. उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ केतकी पाटील, डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंकी, डॉ. प्रेमचंद पंडित, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, प्राचार्य विशाखा गणवीर, उपप्राचार्य जयसिंथ धाया, आणि प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे इ मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मानाचे किताब
कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये विजेत्यांचा गौरव करण्यात आला.मिस्टर आणि मिस फ्रेशर,मिस्टर फ्रेशर: बोधिसित रामटेके मिस फ्रेशर: शिफा पाडवी मिस्टर आणि मिस गोदावरी: मिस्टर गोदावरी: आयुष महाले मिस गोदावरी: श्रेया कांबळे डॉ. केतकी पाटील कॉलेज फ्रेशर्स स्पर्धा: मिस्टर फ्रेशर: अभिजीत सोनवणे मिस फ्रेशर: मानसी वाधानकर महाविद्यालयातील प्रावीण्यासाठी दिला जाणारा गोदावरी आई अकॅडमी अवॉर्ड यंदा खालील विद्यार्थ्यांना देण्यात आला. एम.एस्सी. नर्सिंग: दिवायना पवार बी.एस्सी. नर्सिंग: अंकिता लाहे त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रु. ५००० चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पोर्ट्स वीकचा जल्लोष
स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने आयोजित स्पोर्ट्स वीक मध्ये विद्यार्थ्यांनी क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रनिंग, सॅक रेस, थ्री लेग रेस, बॅडमिंटन, हॉलीबॉल,कॅरम, चेस, आणि लुडो यासारख्या खेळांमध्ये जोशाने भाग घेतला. विद्यार्थिनींनी मेहंदी स्पर्धेत सर्जनशीलता दाखवत कलात्मक सादरीकरण केले.फूड फेस्टमध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी १४ स्टॉल लावले, ज्यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश होता.सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या तालावर नृत्य, केक कापण्याचा समारंभ, आणि रंगीबेरंगी फुगे उडवून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या सोहळ्याचा समारोप डिनर नाईटने झाला.

वाहतूक नियम जागृतीसह नववर्षाचे स्वागत
गोदावरी ग्रुपच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटने १ जानेवारी २०२५ रोजी वाहतूक नियमांसह नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, स्वतंत्र चौक, आणि तावर चौफुली येथे वाहतूक नियम जागृतीसाठी जनतेशी संवाद साधला. हा कार्यक्रम जळगाव शहरात विशेष आकर्षण ठरला. अंतरंग स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियंका गवई, प्रा. दिवायना पवार, प्रा. गिरीश खडसे,प्रा. श्वेता लांडगे, प्रा. जॉय जाधव सर्व शिक्षक वृंद, अभ्युदया बॅच २०२१, आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.विद्यार्थ्यांच्या यशाची आणि सर्जनशीलतेची झलक ’अंतरंग’च्या माध्यमातून उलगडली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.