⁠ 
[rank_math_breadcrumb]

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर ; आता ‘या’ महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana) गेल्या वर्षीच्या जुलै २०२४ पासून सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहे. आतापर्यंत या योजनेचे डिसेंबर पर्यंतचे सहा हप्त्याचे ९००० रुपये जमा झाले आहे. आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या पैशांची प्रतीक्षा आहे. परंतु अशातच आता लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे. तपासणी झाल्यावर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आमच्याकडे अनेक अर्ज आहेत की ज्यात त्यांनी स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. लग्न होऊ स्थलांतरित झालेल्या महिलांचा आधार नंबर चुकीचा असणे, सरकारी नोकरी असणे, यामुळे मी पात्र नाही, असं अनेक महिलांनी सांगितले आहेत. त्यामुळे सरसरकट सर्व अर्जांची फेरतपासणी होणार नाही.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत. त्यात सरकारी नोकरी असलेल्या किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्याचसोबत ज्या महिलांना पेन्शन मिळते, त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. त्याचसोबत महिलांच्या कुटुंबातील कोणी जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, असं काहीही होणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. या योजनेत लवकरच महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, असंही सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर हे पैसे दिले जातील, असं सांगितलं जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.