⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह राज्यातील 9 IPS अधिकार्‍यांना पदोन्नती

जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह राज्यातील 9 IPS अधिकार्‍यांना पदोन्नती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी (Dr. Maheshwar Reddy) यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमध्ये राज्यातील सुमारे 9 आयपीएस (IPS) अधिकार्‍यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे

या अधिकार्‍यांना पदोन्नती
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा. आर., पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन.टी.ठाकूर यांचा समावेश आहे.

सर्व पोलीस अधिकार्‍यांची पदोन्नतीनंतर नेमणूक त्याच ठिकाणी राहणार असून पुढील काळात त्यांची पदोन्नती होऊन इतर ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. अधिकार्‍यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.