बातम्याराष्ट्रीय

भयंकर! दक्षिण कोरियातील विमान अपघातात 179 जण ठार, दुर्घटनेचे कारण समोर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दक्षिण कोरियामध्ये (South Korea) लँडिंगवेळी विमान क्रॅश झालं अन् दुर्घटना घडली. या विमानात एकूण १८१ जण होते. त्यात १७९ जण ठार झाल्याची माहिती समोर आलीय तर दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. South Korea Plane Crash

दक्षिण कोरियामध्ये घडलेली ही विमान दुर्घटना आज रविवारी सकाळी घडली असून ती घटना दक्षिण-पश्चिमी परिसरातील मुआन विमानतळावरील आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एका तांत्रिक गडबडीने 179 प्रवाशांचे प्राण घेतले. घटनेत दोन प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले.

जेजू एअर (Jeju Air) कंपनीचे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियात परत येत होते. बँकॉकहून या विमानाने उड्डाण घेतले. कोरियन वेळेनुसार, सकाळी 9:07 वाजता मुआन विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरले. पण त्याचे चाक घसरले आणि ते संरक्षण भिंतीवर जाऊन आदळले. आणि ब्लास्ट झाले.

ब्लास्ट झाल्याचा आवाज मुआनमध्ये जोरदार घुमला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

मुआन विमानतळावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. पण यात प्रवाशांना वाचवता आले नाही. दोघांची सुखरूप सुटका करता आली. 179 प्रवाशांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button