जळगाव लाईव्ह न्यूज । चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेला सुरुवात होण्यास दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असून आता या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नुकत्याच झालेल्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर, त्यांचे सामने दुबईसारख्या तटस्थ स्थानावर खेळवले जाणार आहेत. Champions Trophy 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, ज्यामध्ये यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कराची येथे आयोजित केला जाईल. भारतीय संघ 20 फेब्रुवारी 2025 रोजी बांग्लादेश विरुद्ध आपला पहिला सामना खेळेल, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत प्रतीक्षित सामना 1 मार्च 2025 रोजी तटस्थ स्थानावर होणार आहे.
सामन्यांचे वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन गट पाडण्यात आले आहेत. गट A मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांचा समावेश आहे, तर गट B मध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. पाकिस्तानमधील लाहोर, रावलपिंडी आणि कराची या तीन शहरांमध्ये सामने आयोजित केले जातील, परंतु भारतीय संघाचे सामने दुबईसारख्या तटस्थ स्थानावर खेळवले जातील.
हायब्रीड मॉडेलची आवश्यकता
भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर, ICC ने हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर भारताचा उपांत्य फेरीचा सामना दुबईत होणार आहे. दरम्यान, 2024 ते 2027 पर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण ICC स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केल्या जातील.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने:
२० फ्रेबुवारी २०२५ – भारत वि. बांग्लादेश
२३ फ्रेबुवारी २०२५ – भारत वि. पाकिस्तान
२ मार्च २०२५ – भारत वि. न्यूझीलंड