⁠ 
[rank_math_breadcrumb]

प्रवाशांसाठी खुशखबर! जळगाव, भुसावळमार्गे धावणार ‘या’ नवीन रेल्वे गाड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२४ । नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक ते धनबाद आणि रिवा ते मडगाव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना जळगाव, भुसावळ थांबा असणार आहे.

रेल्वे क्रमांक ०३३९८ गरीबरथ विशेष ही २२ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी नाशिक येथून ८.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी धनबाद येथे रात्री ९ वाजता पोहोचेल. रेल्वे क्र. ०३३९७ गरीबरथ २० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार रोजी धनबाद येथून रात्री ११ वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी ती नाशिक येथे सकाळी ७ वाजता पोहोचेल.

गोव्यासाठी रिवा-मडगाव गोवा जाण्यासाठी आता आणखी एक विशेष रेल्वे धावणार आहे. ०१७०३ ही विशेष रेल्वे २२ डिसेंबर आणि २९ डिसेंबर रोजी रिवा येथून दुपारी १२ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी मडगाव येथे रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल. ०१७०४ विशेष रेल्वे २३ डिसेंबर व ३० डिसेंबर रोजी मडगाव येथून रात्री १०.३०ला सुटेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.