जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२४ । महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता सर्वसामान्यांना एक झटका बसलाय. सध्या जुन्या डाळीचे दर वाढले असून तूरडाळही महागली आहे.
खरंतर डाळी आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. डाळींना प्रथिनांचा चांगला स्रोत मानले जाते. डाळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. घराघरात सर्वाधिक वापरली जाणारी नवीन तूरडाळ मात्र अद्याप बाजारात आली नसल्याने जुन्या डाळीचे दर वाढले आहेत. स्थानिक बाजारातील तूरडाळ बाजारात येण्यास अद्याप पंधरा दिवसांचा अवधी असल्याने दरवाढ कायम राहील.
सध्या बाजारात विदेशी डाळ असली तरी या डाळीला मात्र ग्राहकांची फारशी पसंती नाही. सध्या बाजारात जुनी तूरडाळ १८० रुपये तर विदेशी डाळ १५० रुपये किलो आहे. जातो. जळगाव शहरात अकोला येथून तूरडाळीची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ती कमी आहे.