⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जळगावमध्ये एकाच दिवसात सोनं 1300 रुपयांनी वाढले, आताचे भाव पाहिलेत का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । सोने आणि चांदीच्या भावात चढ-उताराचे सत्र कायम असून जळगावच्या सुवर्ण पेठेत एकाच दिवसात दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ दिसून आलीय. यामुळे लग्नसराईसाठी सोने आणि चांदीचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची मोठी झळ बसत आहे.

बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात सोने १३०० रुपये प्रति तोळ्याने वाढले. तर चांदीही एक हजार रुपये किलोने महागली. यामुळे आज गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने ७८३०० रुपये तोळा (जीएसटीसह ८०६४९) तर चांदी ९५००० रुपये किलोवर स्थिरावले. तर त्याआधी शनिवार व रविवारी शुद्ध सोने ७६६०० रुपये तोळा (जीएसटीसह ७८८९८) आणि चांदी ९३००० रुपये किलो होती.

दिवाळीत ३० ऑक्टोबरला शुद्ध सोने ८०,४०० रुपये तोळा तर चांदी १ लाख रुपये किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर तेराच दिवसांत सोने ४,३०० रुपये प्रति तोळा तर चांदी ९ हजार रुपये किलोने स्वस्त झाली होती. डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सी चलनाला अनुकूल आहेत. सध्या चीनकडून सोन्याची खरेदी केली जात आहे. फेड रेटकडेही लक्ष लागून आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी येत आहे. यात आणखी प्रति तोळा २० डॉलरपर्यंत (१७०० रुपये) तेजी येईल असा अंदाज व्यक्त केला.