⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

थंडीमुळे जळगावकर गारठले; थंडीची तीव्रता आणखी वाढणार, वाचा आजचे तापमान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. उत्तर भारतातून थंड येणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे जळगावसह राज्यात थंडी चांगलीच पसरली आहे. किमान तापमान १० अंशाच्या खाली आल्याने थंडी वाढली. हाडं गोठवणाऱ्या या थंडीमुळे जळगावकर चांगलेच गारठले असून जळगावकरांना घराबाहेर पडताना गरम आणि उदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान मंगळवारी ८.६ पर्यंत घसरलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी ९ अंश पर्यंत पोहोचला. यापूर्वी २०२० मध्ये अशाच प्रकारे तापमान ६ अंशांपर्यंत घसरल्याने दोन आठवड्यांपेक्षाही अधिक काळ कडाक्याची थंडी होती. शहरात बुधवारी दुपारपर्यंत थंडी होती. दुपारचे कमाल २८ अंश तापमान संध्याकाळी पुन्हा कमी होऊन १५ अंशावर आले. पुढील आठवड्यात, कमाल तापमान २७ ते ३४ अंश दरम्यान तर किमान तापमान ८ ते १४ अंश राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता वाढणार आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.