⁠ 
[rank_math_breadcrumb]

विधानसभेतील दारुण पराभवानंतर गुलाबराव देवकरांचा अजित पवार गटात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वच्या सर्व अकरा जागांवर विजय मिळविल्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीनंतर पराभव झालेल्या मविआच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली असून याच दरम्यान, जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. जळगावचे माजी पालकमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे शरद पवार गटाची साथ सोडणार आहे.

देवकर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रमीण मतदारसंघातून शरद पवार गटाकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांचा गुलाबराव पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.

विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

तटकरेंसोबत सकारात्मक चर्चा गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत देवकर यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. या भेटीदरम्यान, देवकरांनी गटात सामील होण्याची तयारी दर्शवली असून, तटकरे यांनीही त्याच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे. यामुळे आता त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी फायदा होणार का? हे पाहणं गरजेचं आहे