जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । जळगाव महापालिके अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईन चोरी प्रकरणात सहा जणांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला. आहे गंभीर बाब म्हणजे जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचेही नाव संशयित आरोपींमध्ये असल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पाईप चोरी प्रकरणात डीवायएसपी संदीप गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग जवळील आर्यन पार्क समोर दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने उकरून त्यातील सहा बीडचे पाईप चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवण्यात आली होती.
याप्रकरणी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान नरेंद्र पानगडे यांना पायास फ्रॅक्चर होऊन प्लास्टर बांधले असल्याने त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. तर सुनील महाजन हे फरारी आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे बिडाचे एकूण सहा पाईप व अडीच लाख रुपयांचे जेसीबी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी कोणाचा सांगण्यावरून चोरी केली, या गुन्ह्यात अजून कोणाचा समावेश आहे, आदींची तपास देखील सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.