⁠ 
बुधवार, डिसेंबर 4, 2024
Home | गुन्हे | मुक्ताईनगरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला; तिघांना अटक

मुक्ताईनगरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला; तिघांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२४ । मुक्ताईनगरातून पुन्हा एकदा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर -ब-हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हरियाणातील दोघे व राजस्थानमधील एक अशा तिघांना अटक करण्यात आली असून हा गुटखा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होता.

मुक्ताईनगर पोलिसात पो. हे. कॉ. रवींद्र अभिमान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सकरुल्ला अब्दुल अजीज (३०, रा. इमाम नगर, हरयाणा) व कैफ फारुख खान (१९, रा, राजस्थान), तारीफ लूकमान खान (२३, रा. इमाम नगर, हरयाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी मुक्ताईनगरकडे ब-हाणपूरकडून माल ट्रकमधून (एन.एल. ०१/ एजे १७२५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करत होते. ५ एचके व रॉयल १००० सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक करत असताना पोलिस पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण १०२ पिवळ्या रंगाच्या गोण्यांमध्ये एक कोटी ३४ लाख ८८ हजार ४८० रुपये किमतीचा प्रत्येकी ५ रुपये किमतीच्या गुटख्याच्या पुड्या आढळल्या.

तसेच ४३ लाख ७७ हजार ६०० रुपये किमतीच्या एकूण ३२ पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्यांमध्ये ६० प्लास्टिक पन्नीचे पाऊचवर चवर पाऊचमध्ये आढळली. याचबरोबर ३० लाख किमतीचा ट्रक, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ५ हजार रुपये किमतीचा दुसरा मोबाईल तसेच १५ हजार रुपये रोख असा एकूण दोन कोटी आठ लाख ८२ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत. दरम्यान, पर राज्यातून नेहमीच मोठ्या प्रमाणात गुटखा येत असतो. याला पायबंद घालण्यासाठी करडी नजर असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.