⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | गुन्हे | Jalgaon Fraud News : आधी 1000 देऊन विश्वास संपादन केला, नंतर लावला पावणेतीन कोटींना चुना

Jalgaon Fraud News : आधी 1000 देऊन विश्वास संपादन केला, नंतर लावला पावणेतीन कोटींना चुना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । शेअर ट्रेडिंगसह वेगवेगळ्या कारणांनी सायबर ठग संपर्क साधून अनेकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. यामध्ये अनेकांना गंडविले जात असून असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत खासगी ठेकेदाराची तब्बल २ कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने अ‍ॅड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने अ‍ॅप डाउनलोड केले.

शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले. मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही, की मुद्दलही परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय गर्ग व रितू वोरा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.