जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२४ । लग्नसराईत सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. दुसरीकडे चांदीचा भावही घसरला आहे.
जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सोने १४०० रुपये प्रति तोळ्याने घसरले. यामुळे आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. यासोबतच चांदीचा भाव देखील घसरला. मंगळवारी चांदीचा भाव १००० रुपयांनी घसरला. यामुळे आज सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा भाव ९१,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली. १८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७५००० रुपये इतका होता. आठवड्याच्या अखेरीस सोन्याचा भाव ७८,६०० रुपयावर पोहोचला होता. तर चांदीचा भाव आठवड्याभरात २००० हजारांनी वाढला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली.
दोन दिवसात सोने दरात २६०० रुपयापर्यंतची घसरण झाली तर चांदी दरात २ हजाराची घसरण झालीय. यामुळे सध्या सुरु असलेल्या लग्नसराईत सोने चांदीचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला