⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | बातम्या | लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार? मोठी अपडेट आली समोर

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार? मोठी अपडेट आली समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले. त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

यातच विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. त्याआधी महिलांना १५०० रुपये हप्ता दिला जाणार आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी झाला. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेट्‍स चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. https://testmmmlby.mahaitgov.in/ या वेबसाइटवर जाऊन स्टेट्‍स पाहण्यासाठी ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि रजिस्टर मोबाइल नंबर असे दोन ऑप्शन दिले जातात. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरुन कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसेल

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.