⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | लसूण पोहोचला ५०० रुपये किलोवर; गृहिणींचे किचन बजेट कोलमडले

लसूण पोहोचला ५०० रुपये किलोवर; गृहिणींचे किचन बजेट कोलमडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे डाळींसह इतर वस्तू महाग होत असताना दुसरीकडे लसणाचे दर गगनाला भिडले आहे. लसणाचा दर प्रतिकिलो ४५० ते ५०० रुपये आहे. त्यामुळे एक किलो लसूण खरेदीसाठी पाचशेची नोट खर्च करावी लागते.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आठवड्यातून एकदा लसणाची आवक होते. ही आवक ६०० ते ७०० क्विंटल इतकी आहे. घाऊक बाजारात लसणाची ३५० ते ४०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात लसणाची खरेदी करत आहेत. दर अधिक असल्याने स्वयंपाकघरात लसणाचा वापर कमी केला आहे. यंदा लसणाच्या दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे कमी उत्पादन व अतिवृष्टीचे नुकसान आहे. मात्र, नवीन हंगामातील लसूण बाजारात दाखल झाल्यावर दर कमी होतील. मात्र, त्यासाठी अजून २ ते ३ महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले

शेतकऱ्यांकडून यंदा लागवड कमी झाल्याने पुरवठा कमी
मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसारख्या लसूण उत्पादक राज्यांत अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात संकरित लसणाची आवक कमी प्रमाणात आहे. देशी लसणाचा तुटवडा आणखी वाढला आहे. यामुळे दरवाढ होत आहे. पूर्वी भरघोस लसूण उत्पादन होत असल्याने दर स्थिर राहिले. मात्र, पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड कमी केली. परिणामी, पुरवठ्याच्या कमतरतेमुळे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.