जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे भरती मंडळाच्या आरआरबी परीक्षार्थीसाठी मध्य रेल्वेने मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे या गाड्यांना भुसावळ जळगावला थांबा असेल. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
०११०३ आरआरबी विशेष गाडी २३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत दररोज मुंबई येथून दुपारी ३.३० वाजता आणि नागपूर येथे सकाळी १०.५० वाजता पोहोचेल. एकूण पाच फेल्या सुटतील. तर ०९१०४ आरआरबी विशेष गाडी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान दररोज नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल.
या गाडीच्या सुद्धा पाच फेऱ्या होतील. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. दोन वातानुकूलित ३-टियर डबे, ८ स्लीपर व ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांचे आरक्षित तिकीट संगणकीकृत आरक्षण केंद्रावरून मिळेल.