बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर केलीय. जनरल मॅनेजर, डेप्युटी इन्फ्रा सिक्युरिटी स्पेशल प्रोजेक्ट्स मॅनेजर,डेप्युटी जनरल मॅनेजर इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. एकूण १७१ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारंनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (State Bank Of India Job)
जनरल मॅनेजर इन्फ्रा सिक्युरिटी आणि स्पेशल प्रोजेक्ट्स पदासाठी १ जागा रिक्त आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४२ जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी २५ जागा रिक्त आहे. असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर पदासाठी १०१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
स्टेट बँकेतील या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहेत. या भरती मोहिमेत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सूचना वाचावी. (State Bank Of India Recruitment 2024)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी २१ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांना ८५००० रुपये पगार मिळेल.