⁠ 
[rank_math_breadcrumb]

निवडणूक संपताच सोयाबीनचा भाव वाढला; जळगावात इतका मिळतोय भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२४ । यंदाही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. आता विधानसभा निवडणुका संपल्या असून सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव राज्यात या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती.

ऐन निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. यासाठी राज्य सरकारने राज्यात हमीभावाने खरेदी केंद्रे उघडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव ४८९२ इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरु केली. परंतु निवडणूक काळात ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाहीत.

सध्या सोयाबीन भावात वाढ झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. निवडणुकीनंतर शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळू लागले असून विविध बाजारसमित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. जळगावात सोयाबीनला किमान ४२५० ते कमाल ४४०० पर्यंतचा भाव मिळत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.