⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?

उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. मविआला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याचीही राज्यात चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा उद्या सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. यावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रि‍पदे मिळतील, अशी शक्यता आहे. पाहूयात संभाव्य मंत्र्यांची नावे…

भाजप –
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
मंगलप्रभात लोढा
रविंद्र चव्हाण
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
गणेश नाईक
प्रवीण दरेकर
राहुल नार्वेकर
गिरीष महाजन
अतुल भातखळकर
नितेश राणे
राहूल कूल
संजय कुटे
माधुरी मिसाळ
पंकजा मुंडे
मंदा म्हात्रे
देवयानी फरांदे

एकनाथ शिंदे शिवसेना –
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
दादा भुसे
भरत गोगावले
संजय शिरसाट
उदय सामंत
दीपक केसकर
संजय राठोड
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार

अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस –
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्रम
अनिल पाटील
नरहरी झिरवाळ
आण्णा बनसोडे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.