⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | या निवडणुकीतून मुक्ताईनगर मतदारसंघाला रविंद्र भैय्यांच्या रूपाने दोन आमदार मिळणार – रोहिणी खडसे

या निवडणुकीतून मुक्ताईनगर मतदारसंघाला रविंद्र भैय्यांच्या रूपाने दोन आमदार मिळणार – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । इतर मतदारसंघात मतदानातून एक आमदार निवडला जाणार आहे परंतु मुक्ताईनगर मतदासंघांत तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करून दोन आमदार निवडणार आहात असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवड येथिल जाहीर सभेत केले

तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारं आहे आणि सरकार आल्या नंतर रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषदचे आमदार बनवण्याचे आश्र्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे. आणि आपण सुद्धा त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरणार आहे म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी उपस्थितांना विनंती केली.

मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ बोदवड येथिल गांधी चौकात माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, विशाल खोले महाराज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ॲड रोहिणी खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या बोदवड तालुक्याने कायम शरद पवार साहेबांवर निष्ठेने प्रेम केलेले आहे ते प्रेम कायम ठेवा अशी विनंती करायला मी आले आहे. राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेच्या विरोधी असणारे महायुती सरकार बदलवून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब राज्यभर प्रचार सभा घेत आहेत म्हणून आपले एक एक मत महत्वाचे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महीला, तरुण, शेतकरी, सर्व सामान्यांसाठी विकासाची पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायला आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती रोहिणी खडसे यांनी केली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.