जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येत आहे. दरम्यान जळगाव शहरात पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये २० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. सदरची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून संपुर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांच्या कडून ही नाकाबंदी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटींची रक्कम सापडली
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आले आहेत. तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांनी जप्त केला आहे. जळगाव जिह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या रक्कमेमुळे खळबळ उडाली आहे.