जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२४ । मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी, बेलखेड, धामणदे, भोकरी, नरवेल, पिंप्रि भोजना, लोहारखेडा, बेलसवाडी, पिंप्री नांदू या गावांमध्ये जन आशिर्वाद पदयात्रा काढून मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.
यावेळी गावागावांत रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटलेली दिसली. पदयात्रेत तरुणांचा मोठया प्रमाणावर समावेश होता. ‘रोहिणीताई आगे बढो.. हम तुम्हारे साथ है’ आणि ‘विकासाची एकच ग्वाही रोहिणीताई’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावागावात आबालवृद्धानी रोहिणी खडसे यांना विजयासाठी आशिर्वाद दिले तर महिलांनी रोहिणी खडसे या आमच्या मधीलच एक भगिनी असून, त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्या ते सोडवतील असा विश्वास असल्याचे सांगून, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभत आहे.
एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघांच्या विकासाचा शेतकरी कष्टकरी यांच्या उत्थानाचा वसा रोहिणी खडसे या चालवत असून, मतदारसंघांतील रखडलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना बहुमताने निवडून देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन विनोद तराळ यांनी मतदारांना केले. यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.