⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव, भुसावळातून गोव्याला जायचयं.. नो प्रॉब्लम; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला मुदतवाढ

जळगाव, भुसावळातून गोव्याला जायचयं.. नो प्रॉब्लम; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जळगाव, भुसावळातून गोव्याला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०११३९/४० नागपूर-मडगाव या द्वि-साप्ताहिक स्पेशल ट्रेनचा कालावधी आता डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे.एकूण अप-डाऊनच्या ५२ फेऱ्या होणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पर्यटकांना गोव्याचे विशेष आकर्षण असते. त्यात कमी पैशात गोव्याची सफर करायची म्हटले तर नागरिकांची रेल्वे गाडीलाच पसंती दिली जाते. कारण खिशाला परवडेल अशा प्रवास भाड्यात रेल्वे गाडी गोव्याला नेऊन सोडते. भुसावळ मार्गे गोव्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या धावतात. यात नागपूर-मडगाव-नागपूर ही रेल्वेगाडी आहे.

आठवड्यातून दोन वेळा ती उपलब्ध असते. या गाडीची मुदत आता संपणार होती. मात्र, या गाडीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता गाडी नंबर ०११३९ नागपूर मडगाव द्वी साप्ताहिक स्पेशल ट्रेनला २८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११४० मडगाव -नागपूर द्वी साप्ताहिक स्पेशल ट्रेन दर २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.नागपूर-मडगाव ही रेल्वे नागपूर येथून मंगळवारी व रविवार तर मडगावहून बुधवार व शनिवारी असेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.