⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | गुन्हे | ऑनलाइन जॉबची ऑफर उच्चशिक्षित तरुणाला पडली महागात; ठगबाजांनी लावला लाखोंचा चुना..

ऑनलाइन जॉबची ऑफर उच्चशिक्षित तरुणाला पडली महागात; ठगबाजांनी लावला लाखोंचा चुना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२४ । विविध प्रकारचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना गंडा घातला जात असून अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय. ऑनलाइन जॉबची ऑफर देऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राहुल कृष्णा चौधरी (वय २६) या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ७२ हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणार राहुल कृष्णा चौधरी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याला ७ ऑक्टोबरला टेलिग्रामवर एक मेसेज आला. त्यावर रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने मी प्राइस रनर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून चांगल्या कमाईचे ऑनलाइन जॉब पाहिजे असल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. या मेसेजकडे राहुलने दुर्लक्ष केले. मात्र ११ ऑक्टोबरला पुन्हा त्याला हा मेसेज पाठविण्यात आला. यात जॉबवर ऑफर असून आठ हजारातच कामाला सुरूवात करता येईल, असे प्रलोभन देण्यात आले होते. याला बळी पडत राहुलने ऑनलाइन पैसे भरले.

यानंतर दुसरी योजना सांगत नव्या सापळ्यात ओढले. यात लक्झरी प्रोडक्ट मिळाले असून ते मिळविण्यासाठी १५ हजार रूपये भरावयास सांगितले. ही रक्क्म देखील त्यांनी भरल्यानंतर ठगांनी राहुल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ९ हजार ८०० रूपये त्यांच्या खात्यावर पाठविले. नंतर १९ ऑक्टोबरला पुन्हा मेसेज पाठवत आमच्या वेबसाइटवर तुमच्यासाठी आणखी ऑफर आहे. म्हणून ३० हजार रूपये भरावे लागतील असे सांगितल्यावर राहुल याने पुन्हा ३० हजार रूपये भरून ऑनलाइन कामाला सुरूवात केली. असे करत वेळोवेळी एकूण ४ लाख ७२ हजार रूपयांची रक्कम राहुल याने पाठविली.

ती रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांची मागणी केल्याने फसवणूक झाल्याचे राहुलच्या लक्षात आले. यामुळे त्याने पैसे परत मागितले असता समोरच्याने पैसे परत न केल्याने चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.