⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | बातम्या | सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! याबाबत नवीन नियम जारी, काय आहे जाणून घ्या?

सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! याबाबत नवीन नियम जारी, काय आहे जाणून घ्या?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

DoPPW ने दिलेल्या गाइडलाइन्सनुसार, १८ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियतकालिक पडताळणी करणे गरजेचे आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता निश्चित करण्यास मदत होईल. तसेच कर्मचाऱ्याबद्दल सर्व माहिती मिळवण्यासाठी मदत होईल.

सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, विभाग प्रमुख आणि लेखा कार्यालय हे संयुक्तपणे कर्मचाऱ्यांची पडताळणी करतील. यानंतर कर्मचाऱ्याला पडताळणी प्रमाणपत्र दिले जाईल. केंद्रिय नागरी सेवा नियम २०२१ अंतर्गत सत्यापन सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. सेवानिवृ्त्तीच्या आधी पाच वर्षे तरी ही पडताळणी पूर्ण झालेली असावी.अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

ही सर्व प्रक्रिया निवृत्तीपूर्वी करायची आहे. याबाबत सूचना जाहीर करण्यात आल्या आहे. हे प्रमाणपत्र वेळेवर सादर करायचे आहे. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आली आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.