⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावात ज्वेलरी दुकानातून चोरट्याने लांबवीले दागिने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंप्राळा येथील श्रीरत्न कॉलनीतील एक ज्वेलरीचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडून १५७०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी सुरेंद्रकुमार शंकरलाल जैन यांचे पिंप्राळयातील श्रीरत्न कॉलनीतील ज्वेलरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते दुकान बंद करून घरी निघून गेले. हीच संधी साधून त्यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी सोने, चांदीच्या दागिन्यासह रोकड चोरून नेले.

ही घटना जवळच राहणारे शैलेंद्र पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मध्यरात्री २ वाजता जैन यांना संपर्क साधून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. जैन यांनी लागलीच दुकान गाठून पाहणी केल्यावर त्यांना ८ हजार रूपये किंमतीचे १६ नग चांदीचे जोडवे, ७ हजार २०० रूपये किंमतीची १२ नग फुल्या आणि ५०० रूपये रक्कम असा एकूण १५ हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरी गेलेला दिसून आले. याप्रकरणी जैन यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.