⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका; ६० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

जळगाव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका; ६० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडला असताना जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात एरंडोलची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले असून जिल्हा परिषद सदस्यांसह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

एरंडोल मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटांनी लढवली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्यांसह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. अनेक वर्षांपासून शिवसेना लढवत असलेली जागा शिवसेने न लढवता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला.

नानाभाऊ महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र माघार घेत त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करत राजीनामे दिले आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी रक्ताचे पाणी केलेय, शिवसेनेने निवडणूक लढवली. मात्र यावेळी शिवसेनेला ही जागा मिळाली नाही. त्यामुळे राजीनामे देत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राजीनामे दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या राजीनामामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामामुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून महाविकास आघाडीचे उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.