⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | गुन्हे | भुसावळ महिलेच्या हत्येने हादरले, संशयीत पतीला मनमाडमधून अटक

भुसावळ महिलेच्या हत्येने हादरले, संशयीत पतीला मनमाडमधून अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील द्वारका नगरातील रहिवासी वर्षा अजय गुंजाळ (वय २५) या महिलेचा पती अक्षय गुंजाळ याने डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून खून केल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पसार होण्याच्या प्रयत्नातील आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

शहरातील द्वारका नगरात खून झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अत्यवस्थ अवस्थेत महिलेस ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले असता महिलेस वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत महिलेचे विच्छेदन बुधवारी ग्रामीण रुग्णालयात होईल. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पती-पत्नीमधील वाद यामागील कारण असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.